शांत स्वभावाचा राजकीय जिवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

0

मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे त्यांच्या शांत स्वभावासाठी परिचित आहेत. त्यांनी नुकतीच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर दिलखुलासपणे भाष्य केले आणि अनेक किस्से सांगितले. यावेळी आपल्या या शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला आहे का? असा प्रश्न केला असता, त्यांनी यावर अगदी मनमोकळेपणाने भाष्य केले. अशा स्वभावामुळेच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो, असे ते म्हणाले.

आपल्या शांत स्वभावासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, “प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो. यासाठी माझा शांत स्वभावही कारणीभूत असेल, कारण मी कुणाला, फारसा दुखावण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. पण याचा तोटाही जास्त आहे याचा, कधी अशांतही झाले पाहिजे. ते होत नसावा हा तोटा आहे माझा. त्यामुळे तोटाही कधी होत असेल. कधी कधी लवकर गरम होणारे जे असतात, त्यांच्यासाठीही काही फायदे असतात काही तोटे असता. प्रत्येक स्वभावाचे काही फायदे काही तोटे आहेत.”

यावेळी त्यांनी आपल्या शालेय शिक्षणापासून, उच्च शिक्षणापासून ते आपण राजकारण कस कसे आलो, यावरही भाष्य केले. बाळासाहे थोरातांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर वकीलीही सुरू केली होती. यासंदर्भात आपल्याला पहिल्या वकिलीची फीस किती मिळाली? असे विचारले असता, थोरात म्हणाले, “मी जेव्हा वकिली करायचो, तेव्हा माझे वडील कारखान्याचे चेअरमन होते आणि आमदारही होते. त्यावेळी असे व्हायचे की, ज्या लोकांची कामे तहसील कचेरीत गुंतलेली असायची, एमएसईबीमध्ये गुंतलेली असतील, त्या लोकांनी त्यांना शोधण्याऐवजी मलाच शोधायला सुरुवात केली. काही केसेस मी चालवल्या, ते १० रुपयांसारखे खर्चायला पैसे द्यायचे, मी पाचशे हजार रुपयांपर्यंतही गेलो होतो. पण मी आमदार होण्यामागे वकिलीही एक कारण आहे. नंतर अनेक चळवळींमुळे राजकारणात आलो आणि वकिली सुटली, असे थोरात म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 04-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here