कर्जी जि. प. शाळेतील शिक्षक राजेश भागणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0

खेड : जिल्हा परिषद रत्नागिरी प्राथमिक शिक्षण विभाग तर्फे सन २०२१-२२ या वर्षासाठी जिल्ह्यातील निवडण्यात आलेल्या दहा जिल्हा परिषद आदर्श शिक्षकांमध्ये खेड तालुक्यातील कर्जी येथील कुणबी आदर्श शाळेतील शिक्षक राजेश भागणे यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण २२ प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. दि. १३ जुलै रोजी छाननी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दि.५ ऑगस्ट रोजी मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीसाठी २२ पैकी १९ शिक्षक उपस्थित होते. त्यापैकी दहा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. राजेश भागणे हे उत्तम क्रीडा शिक्षक असुन ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत उच्चप्रतीच्या खेळाचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांची सतत धडपड असते. ते कार्यरत असलेल्या जिल्हापरिषद आदर्श प्राथमिक शाळा कर्जी कुणबी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले आहेत. राजेश भागणे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे कर्जी ग्रामस्थ व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:55 PM 04-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here