‘गोपीचंद पडळकर अज्ञानी बालक, नुकतंच उगवलेलं गवत’ : विजय वडेट्टीवार

0

नागपूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पत्रावर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खरमरीत टीका केली आहे. ‘गोपीचंद पडळकर हा अज्ञानी बालक आहे. तो नुकतंच उगवलेलं गवत आहे. तो सध्या आपला मुळ शोधत आहे. त्याला ओबीसी आरक्षण आणि त्या संदर्भातल्या उपसमिती संदर्भात विषय काय कळतो’, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. पडळकर यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना ओबीसी आरक्षण संदर्भातली एक उपसमिती हरवली आहे. ती समिती काम करत नाही अशा आशयाचे पत्र लिहिले होते. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता वडेट्टीवारांनी पडळकरांवर टीका केली आहे.

त्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 04-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here