अजय देवगणने केले रत्नागिरी पोलिसांचे कौतुक

0

सध्या सर्वत्र तान्हाजी चित्रपटाचा गवगवा सुरू आहे. या चित्रपटाची चलती सुरू असतानाच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीस कल्याण निधीअंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी तान्हाजी चित्रपट दाखवण्यात आला. या उपक्रमाची थेट दखल तान्हाजी चित्रपटातील अभिनेता अजय देवगण याने घेतली असून, या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल जिल्हा पोलिसांना धन्यवादही दिले आहेत. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणत कोकणातील उमरठ (जि. रायगड) येथील तानाजी मालसुरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांना सुपूर्द केला. शिवछत्रपतींचे विश्वासू सहकारी तानाजी मालसुरे यांच्या पराक्रमाची यशोगाथा इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली आहे. त्यांच्या बलिदानाचे आजही स्मरण केले जात आहे. याच विषयावर अजय देवगणने तान्हाजी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने लहानांपासून थोरांपर्यंत साऱ्यांनाच भुरळ घातली आहे. चित्रपटाने सर्व रेकॉर्ड ब्रेक करून उच्चांक गाठला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांना या चित्रपटाने प्रभावीत केले. तानाजी मालसुरे यांच्या शौर्याचे दर्शन घडविणारा हा चित्रपट कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना दाखविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पोलीस कल्याण निधीअंतर्गत त्यांनी मंगळवारी सायंकाळी ३ ते ६ यावेळेत रत्नागिरीतील सिटी प्राईड राधाकृष्ण येथे सर्वांना चित्रपट दाखविला.त्यानंतर लगेचच जिल्हा पोलीस दलाच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाविषयी पोस्ट टाकण्यात आली. क्षणार्धात पोस्टला शंभरपेक्षा अधिक लाईक्सही मिळाल्या. एवढेच नव्हे तर ही पोस्ट चक्क तान्हाजी चित्रपटातील तानाजीची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणनेही पाहिली. त्याने या उपक्रमाबद्दल रत्नागिरी पोलिसांचे कौतुक केले.एवढेच नव्हे तर त्याने आपण खूप आनंदी झाल्याचे आणि आपल्याला अभिमान वाटल्याचे त्यात नमूद करून रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले आहेत. खुद्द तान्हाजीनेच या उपक्रमाचे कौतुक केल्याने पोलिसांमध्ये याच विषयाची चर्चा केली जात आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here