गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या दोघी विद्यार्थिनींनी ‘अ मॅथेमॅटिकल मॉडेल फॉर द डायग्नॉसिस ऑफ डायबेटिस, अॅनेमिया अण्ड हायपरटेन्शन बाय युजिंग फज्जी मॅट्रिक्स’ संशोधन प्रकल्प तयार केला आहे. त्या प्रकल्पाला मराठी विज्ञान परिषदेकडून प्रथम क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मुग्धा पोखरणकर आणि मुक्ताई देसाई या प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींनीच्या ‘अ मॅथमॅटीकल मॉडेल फॉर द डायग्नोसिस ऑफ डायबेटीस, अॅनेमिया अॅड हायपरटेन्शन बाय युजिंग फज्जी मॅट्रिक्स’ हा संशोधन प्रकल्प सादर केला होता. त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक दिनी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
