आंजणारी घाटीत एसटी बसला आराम बसची धडक; पाचजण जखमी

0

लांजा : एसटी बस रत्नागिरी ते लांजा जात असताना मागून येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात लक्झरी बसमधील पाचजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले. हा अपघात महामार्गावरील आंजणारी घाटीत घडला. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरुन धावणाऱ्या खासगी आराम बसने (एचएच ४३/ वाय-६६८९) एसटी बसला (एचएच-१४/बीटी १४५३) मागून धडक दिली. त्यामध्ये लक्झरी बसमधील प्रवासी जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात बसमधील प्रकाश नारायण घाडी (६५), सुरेखा प्रकाश घाडी (६१ रा. अंधेरी मुंबई), जय हर्षद नकाशे (१७), सानिका हर्षद नकाशे (४५), हर्षद श्रीकांत नकाशे (५० रा. गोरेगाव मुंबई) हे प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हातखंबा येथील मोफत रुग्णवाहिकेने लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 06-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here