चोरी प्रकरणी नोकरांवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी नोकरांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि.२९ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. प्रज्ञा गोरे आणि शुभम करंडे (दोन्ही रा. थिबा पॅलेस रोड) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अल्तमश अय्युब झारी (३५,रा.साई चौक कोकणनगर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, २५ ऑगस्ट रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वा.अल्तमश झारी यांनी आईचे कपाट उघडले. तेव्हा त्यांना कपाटातील ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १ हजार चोरीला गेल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी नोकर संशयित प्रज्ञा गोरे आणि संशयित शुभम करंडे यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास सहायक पोलिस भगवान पाटील करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:08 PM 06-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here