‘कोरोना महाराष्ट्र सरकारचा व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल’

0

मुंबई : कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे. तसेच, गणेशोत्सव सणानिमित्त निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यावरुन, मनसेनं पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात करोनाच एवढं स्तोम माजवल जातंय की, यापुढे करोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. सरकारने कोरोना संबधित सर्व डेटा जनतेबरोबर पारदर्शकपणे शेअर केला पाहिजे” असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 07-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here