देशाची राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दिल्लीतील १.४६ कोटी मतदार आपला मताधिकार बजाविणार आहेत. मतदानासाठी दिल्लीमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होणार असून एकुण ६६८ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीमध्ये एकुण १ कोटी ४६ लाख ९२ हजार १३६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.
