लोकमान्य टिळक यांच्या जन्मताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून नेताजी सुभाषचंद्र बोस मिशन या संस्थेचे सुमारे 40 कार्यकर्ते मोटर सायकल रॅलीने सायंकाळी 5 वाजता रत्नागिरीत दाखल झाले. त्यावेळी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहर उपाध्यक्ष प्रशांत साळूंखे, नगरसेवक, शहर युवा अधिकारी अभिजीत दुडये, तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे स्वागत केले. नगरसेविका शिल्पा सुर्वे यांच्यासह भागातील इतर भगिनींनी त्यांचे औक्षण करुन सन्मान केला. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लोकमान्य टिळक यांची स्वातंत्र्य संग्रामाची विचारधारा मिळतीजुळती असूनही या भारत मातेच्या दोन्ही नररत्नांची प्रत्यक्षात भेट कधीच झाली नाही. लोकमान्य टिळकांची जहाल विचारधारा आणि त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान याबद्दल नेताजींना नितांत आदर होता. म्हणूनच नेताजींच्या विचारांचा प्रसार करणार्या कोलकाता येथील संस्थेच्या वतीने हा अनोखा आदरांजलीचा कार्यक्रम कंरण्यात आला. महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर त्यांनी छत्रपती विाजी महाराज यांच्यासह स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, हुतात्मा राजगुरु, चाफेकर बंधू यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर या रॅलीने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी दलितांना खुले केलेल्या पतितपावन मंदिराला भेट दिली. यावेळी संस्थेच्या वतीने अॅड़ बाबासाहेब परुळेकर, उन्मेश शिंदे यांनी रॅलीचे स्वागत केले. रत्नागिरीत येण्यापुर्वी या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीचे आमदार आणि उच्च व तंत्रक्षिण मंत्री उदय सामंत यांच्याशी सहकार्यासाठी संपर्क साधला होता. उदय सामंत यांनी या सर्व कार्यकंर्त्यांच्या विनंतीची दखल घेत या सर्वांची निवासभोजनासह इतर सर्व व्यवस्था करुन रत्नागिरीच्या आतिथ्यील संस्कृतीची परंपरा बंगालवासियांना दाखवून दिली.
