गणेशोत्सव मंडळांची बैठक

0

रत्नागिरी : दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन त्यांना कोरोना आणि सण शांततेत पार पाडण्यासाठी सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तर एकूण २३ सार्वजनिक मंडळांपैकी १० मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यंदाही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येणार नाही तसेच कोरोनाचे निबंध तंतोतंत पाळण्याबाबत अधिकाऱ्यांनी सूचना केल्या. मंडळांमध्ये सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून उत्सव काळात तेथे एका संपर्क व्यक्तीची नेमणूक करणे आवश्यक राहणार आहे. गणेशोत्सवात प्रसाद वाटप करताना शक्यतो तो टाळावा किंवा कोरडा असावा असेही यावेळी सांगण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काळजी घ्यावी, विसर्जनाला जाताना कमी गर्दी असावी असेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:50 AM 08-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here