नितेश राणे यांच्या प्रयत्नातून 8 आणि 9 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे कोकणातील पहिल्या मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मिसळ प्रेमींना या महोत्सवाचे निमंत्रण दिलं आहे. ‘भावाशी, मिसळचं झटको होयो तर येवा वैभववाडीत’, अशा शब्दात राणे यांनी मिसळ प्रेमींना साद घातली आहे.
