”मोदी एक्स्प्रेस? कोकणाशी मोदींचा संबंध काय?”

0

मुंबई : कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून चाकरमान्यांसाठी एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली त्या एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सचिन सावंत म्हणाले की, मोदी एक्स्प्रेस? कोकणाशी मोदींचा संबंध काय? चक्रीवादळ आले, पूर आला तरी पहायला देखील आलें नाहीत. गुजरातला तात्काळ जाऊन मदत जाहीर केली. कोकणाबद्दल आस्थाही नाही. उलट कोकणवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. नाव द्यायचंच होतं तर बॅ.नाथ पै किंवा मधु दंडवतेंचे दिले असते. असे ट्विट करत भाजपवर त्यांनी हल्ला केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 08-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here