खोट्या आणि आकर्षक जाहिरांतींवर दंड ठोठावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्वचा उजळणे, उंची वाढणे, केसांची गळती रोखा, शरीरसंबंधाबाबत दावे करणाऱ्या आक्षेपार्ह जाहिराती केल्यास आता ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या खोट्या जाहिराती दाखवून सामान्य माणसांची दिशाभूल करण्याऱ्या जाहिराती रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवा कायदा आणला आहे.
