सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याच्या रेडी बंदरात नॉथन बॅंडन हे चीनचे जहाज दाखल झाले आहे. त्यामुळे बंदरात ‘हाय ऍलर्ट’ जारी करण्यात आला असून वेंगुर्ल्यासह संपूर्ण जिह्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. रेडी बंदरात चीनमधून खनिज वाहतूक करणारी जहाजे येत असल्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बंदर आणि कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केली. तसेच विषाणूच्या भीतीने ते मास्क लावून काम करू लागले आहेत.
