महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या या विधानाने महाविकास आघाडीमधील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचं वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे.
