जिल्हा रुग्णालय परिसरातील इमारतीला आग

0

सिंधुदुर्ग: जिल्हा रुग्णालय परिसरातील वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकारी वर्गासाठीच्या इमारत वसाहतीला गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. सुदैवाने या इमारतीमध्ये कोणीही राहत नसल्याने मनुष्यहानी टळली. मात्र, आतील सामानाचे व इमारतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी ७ वाजता कुडाळ एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यास कर्मचाऱ्यांना यश आले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here