उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या संकल्पनेतून होत असणाऱ्या टिक टॉक स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

0

रत्नागिरी खबरदार आणि आपुलकी सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकणातील पहिल्या टिक टॉक स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धकांनी मोठ्या संखेने या स्पर्धेत भाग घेतल्याने काही काळ या स्पर्धेच्या वेबसाईट मध्ये बिघाड देखील निर्माण झाला होता. मात्र आता हा दोष दूर करण्यात आला आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे स्पर्धक https://forms.gle/dzYUuxuCidba25yw7 या लिंकवर आपला व्हिडीओ अपलोड करू शकतात. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध उद्योजक आई सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्या संकल्पनेतून हि अभिनव स्पर्धा रत्नागिरीत होत आहे. दिनांक १६ फेब्रुवारी पर्यंत स्पर्धक या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रत्नागिरी मारुती मंदिर येथील संसारे उद्यानात या स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या ठिकाणी या स्पर्धेतील विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here