नाटे-आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तात्पुरती स्थगिती दिली असली तरी या प्रकल्पाला सागवे परिसरातील शिवसेना शाखाप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. याचबरोबर आयलॉग, नाणारसारखे प्रकल्प परिसरात व्हायला हवेत, अशी भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्थानिकांचा पाठिंबा असल्याचे मान्य करून या प्रकल्पांना हिरवा कंदील देतात का? याकडे लक्ष लागले आहे.
