शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने बेळगावमध्ये हे अटक वाॅरंट जारी करण्यात आले आहे. गेल्यावर्षी 13 एप्रिल 2018 रोजी बेळगाव शहराजवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आचारसंहिता लागू असूनही भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आपल्या भाषणातून केलं होतं.
