चरवेली येथील वळणावर कार उलटून तिघे जखमी

0

नाणीज : मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळील चरवेली येथील वळणावर मंगळवारी रात्री कार उलटून तिघे जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबतची माहिती अशी की, एम.एच ०८- झेड-८८५८ ही कार कणकवलीहून रत्नागिरीकडे जात होती. ती चरवेली येथील वळणावर उलटून तिघे जखमी झाले. याची माहिती मिळताच श्री क्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. लोकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुधीर विश्वनाथ वेल्हाळ (५८), प्रियंका सुधीर वेल्हाळ (५५), सुलभा विश्वनाथ वेल्हाळ (वय ८०, रा. सर्व कारवांचीवाडी, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 09-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here