सिंधुदुर्गात तीन डेडिकेटेड कोव्हीड सेंटर्सचे लोकार्पण

0

संगमेश्वर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मालवण आणि सावंतवाडी येथे भाजप आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून उभारण्यात आलेल्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटर्सचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत झाला. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कोव्हीड सेंटरसाठी १ कोटी ३३ लाख ५० हजार खर्च आला असून प्रत्येकी ३५ बेडची हि सेंटर्स आहेत. याचा जिल्हयातील ६ तालुक्यातील २५ ते ३० हजार लोकांना फायदा होणार आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या आमदार निधीतून देवगडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे, भाजपचे विधान परिषद सदस्य विजय गिरकर यांच्या निधीतून भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडी येथे आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मालवणच्या विद्यार्थी वसतिगृहात हि डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर्स आज रुग्णसेवेत दाखल झाली आहेत. अत्यंत आधुनिक अशी हि कोव्हीड केअर सेंटर्स आहेत. फडणवीस म्हणाले, कोव्हीड काळात तब्बल दीड दोन वर्षे भारतीय जनता पार्टीचे आमदार व कार्यकर्ते काम करत आहेत. सर्वात जास्त व्हॅक्सिन मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. व्हॅक्सिन हाच कोरोनावरील एक उपाय आहे. जी लोकं व्हॅक्सिनला घाबरत आहेत आणी दूर आहेत त्यांना व्हॅक्सिन घेण्यास परावृत्त करा. कुठल्याही राजकारणाचा विचार न करता आमच्या आमदारांनी निधी उपलब्ध करून दिला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. कोरोना हा चाकरमानी आल्याने वाढतो असा काहीजण उल्लेख करत आहेत. पण चाकरमानी हे पाहुणे नाहीत तर ते येथील नागरिक आहेत. एकीकडे सांगतात की कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. आणि दुसरीकडे कोरोना सेंटरचे कर्मचारी कमी करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य बाबतीत सुरक्षित असावा असे उपक्रम महाराष्ट्र राज्याने राबवावे असे आवाहन राणे यांनी केले. दरेकर म्हणाले, पहिल्यांदा कोकणातील पाच आमदारांनी हा निधी उपलब्ध करून दिला आणी पडवे मध्ये सेंटर सुरू झाले. अजून काही मदत लागत असेल तर ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत. कोकणातील लोकांच्या विकासासाठी नारायण राणे यांना जे मंत्री पद मिळाले त्याचा फायदा करून घरा घ्या. नारायण राणे यांच्या माध्यमातून चिपीचे उद्घाटन 9 ऑक्टोबर ला होत आहे, त्याचा आनंद होत आहे. आपण मध्यंतरी आलो होतो आणी माहिती मागितली होती पण दुर्दैव म्हणजे अद्याप पर्यंत ती मिळालेली नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:01 PM 09-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here