बच्चू कडूंच्या मागोमाग राजू शेट्टींचाही महाविकास आघाडीवर घणाघात

0

महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. यानंतर राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही. द्यायचे नाही तर लोकांना फसवता का? गंडवता का?, रोज १० शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहेत, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दात राजू शेट्टींनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here