राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे रॉयलनगरमध्ये जंतुनाशक फवारणी

0

चिपळूण : शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून शहरातील रॉयलनगर परिसरात जंतुनाशक फवारणीचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. महापुरानंतर शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी विविध भागात जंतुनाशक फवारणी सुरू करण्यात आली. याला हातभार म्हणून आ. शेखर निकम यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार युवती काँग्रेसच्या माध्यमातून रॉयलनगर परिसरात जंतनाशक फवारणी हाती घेण्यात आली. यावेळी युवती अध्यक्षा जान्हवी फोडकर यांच्यासह रॉयलनगर परिसरात गणेश वारेकर, आप्पा कुलकर्णी, संजय फोडकर, ज्ञानदेव सावंत, निशा काटकर, अभिजित शिदे, रेवती खातू, शभम कदम, संध्या चितळे, विशाल घाग, दर्शना फोडकर, अनिरुद्ध सकपाळ, सागर फोडकर, निहार काटकर, साहील कदम आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 09-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here