गेल्या आठवड्यात दोन दिवस सलग बँक संप झाल्यानंतर सरकारी बँकांचे कर्मचारी आता पुन्हा एकदा बँकेचा संप पुकारू शकतात. जर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी हा संप करण्यास यशस्वी झाले तर मार्चच्या दुसर्या आठवड्यात एटीएम आणि बँकिंग सेवेवर सलग 5 दिवस परिणाम होऊ शकतो. बीईएफआय आणि एआयबीईए च्या म्हणण्यानुसार, 11 मार्च ते 13 मार्च दरम्यान सलग 3 दिवस बँकांचा संप होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांचा पगार वाढावा या मागणीसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे.
