रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठी छायाचित्र स्पर्धा

0

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आणि रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे २७ सप्टेंबर रोजी पर्यटन दिनाच्या निमित्ताने छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधताना रत्नागिरी जिल्ह्यातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी एक विशेष छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटन स्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचवावी, या उद्देशाने रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे ही निसर्ग छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, वर्षा पर्यटन, कासपठार, निसर्गरम्य दृश्य, नद्या, तलाव, प्राणीजीवन, गिर्यारोहण, ट्रेकिंग, ऐतिहासिक स्थळे, लेणी, गड, किल्ले आणि स्थळांची छायाचित्रे सादर करता येतील. उत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या तीन प्रवेशिकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रमाणपत्र तसेच टी- शर्ट दिला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. १२ बाय १८ इंच ३०० डी. पी. आय सोल्युशन असलेल्या छायाचित्राची प्रत ई-मेलद्वारे व व्हॉटस्ॲप क्रमांकावर २५ सप्टेंबरपर्यंत खालील व्यक्तीकडे द्यावयाची आहेत. छायाचित्रासोबत छायाचित्र टिपलेल्या स्थळांची थोडक्यात माहिती तसेच स्पर्धकांनी स्वत:चे नाव, पूर्ण पत्ता, ई-मेल ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक द्यावयाचा आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यात व्यावसायिक फोटोग्राफरही भाग घेऊ शकतात. छायाचित्र मोबाइल आणि कॅमेरा या दोन माध्यमातून टिपलेली असावीत. छायाचित्रामध्ये कोणतीही छेडछाड करू नये. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये आहे. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पहिल्या तीन क्रमांकांना एक-एक हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे प्रवेश शुल्कासह (गुगल-पे नं. मो. ९१३०३८३६६६ वर) रत्नागिरी येथील प्रसिद्ध छायाचित्रकार अजय बाष्टे- मो.९९७५५५१६५५ आणि विद्याधर साळवी मो. ८३०८३३९५६२ या व्हॉटस्ॲप क्रमांकावर छायाचित्र पाठवावीत आणि संस्थेचा ई-मेल आयडी ratnagiriprytn270921@gmail.com यावर द्यावीत. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आणि मार्गदर्शक सुधीर रिसबुड यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 11-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here