पाली येथे ट्रकच्या डिझेल टाकीतून तब्बल ४ हजार ५५० रुपयांचे डिझेल चोरले

0

रत्नागिरी : पार्क करून ठेवलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून सुमारे ४ हजार ५५० रुपयांचे ७० लिटर डिझेल चोरल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी पाली येथील ऊर्जा पेट्रोलपंप येथे घडली. याबाबत सुरेंद्र शशिकांत रावत (४३, रा. नाणीज, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुरेंद्र रावत यांनी आपला ट्रक पाली येथील पेट्रोल पंपात उभा करून ठेवला होता. तेव्हा अज्ञाताने त्यांच्या ट्रकमधील डिझेल चोरले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here