हानिकारक द्रव अंगावर टाकून केले जखमी

0

रत्नागिरी : कामाचे पैसे मागितल्यावर हिशेब करुन देतो, असे सांगितल्याच्या रागातून एकावर शरीरास अपायकारक द्रव टाकून दुखापत केल्याप्रकरणी ४ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना दि. ५ रोजी रात्री ९ वा नाना-नानी पार्कजवळील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत घडली. शैलेश (२५), दीपक (२६), मुकेश (२८) तसेच रोहित (२९) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बलिराम कोदईप्रसाद शर्मा (३७, मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार बलिराम आणि संशयित हे शहरातील नाना-नानी पार्क जवळील एका इमारतीच बांधकामाचे काम करत आहेत. बुधवारी रात्री संशयितांनी बलिरामकडे कामाचे पैसे मागितले. तेव्हा हिशेब करुन उद्या सकाळी देतो, असे बलिराम यांनी सांगितले असता त्याचा राग आल्याने शैलेशने बलिराम यांना शिवीगाळ करत तुला जाळून टाकतो अशी धमकी दिली. तसेच अपायकारक द्रव बलिराम यांच्या अंगावर टाकून त्यांना जखमी केले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here