अनिल परब यांचे वांद्रे पूर्व येथील अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश

0

मुंबई : लोकायुक्त वी. एम. कानडे यांनी वांद्रे पूर्व येथील म्हाडा इमारत क्र. ५७ व ५८ मधील अनधिकृत बांधकाम एका महिन्याच्या आत पाडून त्याचा अहवाल लोकायुक्त कार्यालयाकडे म्हाडाने सुपुर्द करावा असा आदेश दिला आहे. भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी, ठाकरे सरकारचे मंत्री श्री अनिल परब हे वांद्रे पूर्व येथील म्हाडा कॉलनीच्या इमारत क्र. ५७ व ५८ मधील मोकळ्या जागेत अनधिकृत कार्यालय बांधुन त्याचा स्वतःचे कार्यालय म्हणुन वापर करत आहे, आणि हे बांधकाम अनधिकृत घोषित करण्यात आले आहे, परंतू मंत्र्यांच्या दबावामुळे म्हाडा हे अनधिकृत बांधकाम पाडत नाही अशी तक्रार लोकायुक्तांकडे मार्च महिन्यात केली होती.
गेले ३ महिने या याचिकेची सुनावणी लोकायुक्तांकडे सुरु होती गेल्या आठवड्यात या याचिकेची सुनावणी मा. लोकायुक्त जस्टिस वी. एम. कानडे यांच्या समोर झाली.
1) जुन व जुलै २०१९ मध्ये २ वेळा म्हाडाने अनिल परब यांना इमारत क्र. ५७ व ५८ मधील त्यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश दिले होते.
2) अनिल परबांनी हे बांधकाम तोडले नाही म्हणुन म्हाडाने पोलिस व महानगरपालिकेची मदत मागितली होती.
3) अनिल परब मंत्री झाल्यावर त्यांनी म्हाडावर दबाव आणले.
4) भाजपा नेते डॉ. किरीट सोमैयांनी या संदर्भात लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली व सुनावणी दरम्यान हे कार्यालय अनिल परबांचे असल्याचे सिद्ध होत आहे, हे कार्यालय अनधिकृत आहे म्हणुन पाडावे अशी मागणी केली.
5) सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण सचिव श्री मिलींद म्हैसकर, म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री योगेश म्हसे यांनी लोकायुक्तांच्या समोर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे मान्य केले.
6) लोकायुक्तांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारल्या नंतर महाराष्ट्र सरकारने हे बांधकाम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाडण्यात येणार असे मान्य केले.
7) हे अनधिकृत बांधकाम पाडल्यावर एका महिन्याच्या आत कार्यालयात अहवाल सादर करावा असे लोकायुक्तांनी राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:15 AM 13-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here