चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या ८४० गाड्यांचे आतापर्यंत आरक्षण

0

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी रत्नागिरीत दाखल झालेले आहेत. गणपती-गौरी विसर्जनानंतर म्हणजेच मंगळवारी दि. १४ सप्टेंबरपासून चाकरमानी यांचा परतीचा प्रवास सुरू होत आहे. यासाठी आतापर्यंत ८४० गाड्या आरक्षित झाल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी माहिती दिली. महिनाभरापूर्वी एसटी आणि रेल्वेचे परतीचे आरक्षण चाकरमान्यांकडून करण्यात आले आहे. १४ ते २२ सप्टेंबर या कालावधीत चाकरमानी यांचा परतीचा प्रवास सुरु होत आहे, यासाठी एसटी महामंडळाकडून योग्य नियोजन करण्यात आले असून ग्रुप बुकिंगला अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाने दिली. दि. २२ सप्टेंबरपर्यंत जवळपास १५०० गाड्या परतीच्या सुटतील, असा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. आगारनिहाय परतीच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आयत्यावेळी ग्रुप बुकिंग केले तरी गाड्या सोडल्या जातील, अशी माहिती भोकरे यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 13-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here