पालशेत येथील कलादालनाचे १७ रोजी उद्घाटन

0

गुहागर : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती रुक्माई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कु. प्रज्ज्वल गुहागरकर कलादालनाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य प्रशांत पालशेतकर असणार आहेत. या कला दालनाचे उद्घाटन प्रकाश राजेशिर्के (चित्रशिल्पकार, सावर्डे) व डॉ. मंजिरी ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पंढरीनाथ गुहागरकर, विठ्ठल शिवणकर, प्राजक्ता गुहागरकर, शिक्षण प्रेमी शीतल पालशेतकर, संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे, वास्तू शिल्पकार अनिकेत कुंभार, माधवराव मोहिते, जीवन शिंदे, विनयकुमार हणशी, डी. के. शेटे, राहुल कुंभार, सरपंच संपदा चव्हाण, उपसरपंच महेश वेल्हाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, कलाशिक्षक अनंत आगरे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:53 PM 13-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here