‘कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केलं’, योगी आदित्यनाथ यांचं विधान

0

लखनौ : कोरोना विषाणू विरोधात अतिशय नेटानं प्रतिकार केल्याचा दावा करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी कुशीनगर येथील जनसभेला संबोधित करताना एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. “देशातील इतर राज्यांची सरकारं कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. पण आम्ही तर कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकलं आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलेलं असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीनं जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांनी आज कुशीनगर परिसरात एकूण १२० कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण केलं. यासोबत ते अलावा रामकोला विधानसभा मतदार संघाच्या कप्तानगंज येथे आयोजित एका शिलान्यास कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारनं केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवला. तसंच समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

“अब्बाजान म्हणणारे सर्वजण गरीबांचा राशन हडपायचे. कुशीनगरचा राशन तेव्हा थेट नेपाळ, बांगलादेश पर्यंत पोहोचत होतो. कुशीनगर परिसरत शेती, धर्म आणि श्रद्धा यासाठी ओळखला होता. जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात जाणं बाकी आहे. एकूण चारशे कोटींपेक्षा अधिकच्या योजनांचं लोकार्पण करायचं आहे. हे लोकार्पण तर नुसता ट्रेलर आहे. अद्याप बरंच काही होणं बाकी आहे. भगवान बुद्ध यांना समर्पित मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी देखील जरुर येणार आह”, असं योगी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:15 PM 13-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here