काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

0

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं आज मंगळुरूमध्ये निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. जुलैमध्ये योगा करत असताना पडल्यामुळे त्यांना डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानावर काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:39 PM 13-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here