जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस

0

रत्नागिरी : जिल्ह्यात ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर कायम आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस व्यवस्थित आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ३,३६४ मिलीमीटर असून गेल्या १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ३४२४.९७ मिलीमीटर नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजुन तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:05 PM 13-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here