जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार गणेशमूर्तींचे आज विसर्जन

0

रत्नागिरी : जिल्हाभरात आज गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात जवळपास 1 लाख 15 हजार बाप्पांना आज निरोप देण्यात येईल. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जन स्थळांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून विसर्जनाची नियमावली देखील ठरवण्यात आली आहे. जिल्ह्यात गणेश चतुर्थीला सुमारे दिड लाखापेक्षा अधिक गणेशमूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. वाजत गाजत घरी आलेल्या 10 हजार गणरायांना पहिल्या दीड दिवसांनी निरोप देण्यात आला. त्यानंतर गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा झाला. या वर्षी सर्वांच्या घरी केवळ पाचच दिवस बाप्पांनी मुक्काम केला. गणेशोत्सवाच्या या काळामध्ये सर्व भाविकांनी आराध्य गणपतीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना आणि पूजा अर्चा केली. जिल्ह्यात मंगळवारी गौरी विसर्जनाबरोबरच गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गौरी गणपतीसाठी तब्बल 1 लाख 15 हजार गणपतींची प्रतिष्ठापना घरांमध्ये करण्यात आली आहे. गौरी गणपती विसर्जनासाठी मांडवी किनाऱ्यासह भाट्ये, पांढरा समुद्र, मिन्या बंदर, काळबादेवी, साखरतर, आरेवारे किनाऱ्यावर गणपती विसर्जन होते. शहरातील मांडवी समुद्र किनारी गणेश विसर्जनासाठी फार मोठी गर्दी होते. शहरासह साळवी स्टॉप, मारूती मंदीर, माळनाका, परटवणे आदी भागातील गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मांडवी समुद्रकिनारी हजेरी लावतात. मांडवी किनाऱ्यासह गर्दी होण्याच्या सर्व समुद्रकिनारी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सुमारे 14 सार्वजनिक आणि 1 लाख 15 हजार गणरायांना निरोप देण्यात येईल. यापैकी रत्नागिरी शहरामधील 5 हजार 531 घरगुती गणेशेमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात 7 हजार 994 घरगुती गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. जयगड परिसरात 1 हजार 717 घरगुती, संगमेश्वर 9 हजार 177 घरगुती, राजापूर 10, 674 घरगुती, नाटे 5 हजार 632 घरगुती, लांजा 11 हजार 770 घरगुती, देवरूख 8 हजार 170, सावर्डे 9 हजार 322 घरगुती, चिपळूण 9 हजार 775 घरगुती, गुहागर 9 हजार 20 घरगुती, अलोरे 5 हजार 300 घरगुती, खेड 10 हजार 602 घरगुती, दापोली 2 हजार 500 घरगुती, मंडणगड 3 हजार 56, बाणकोटमध्ये 395 घरगुती, पूर्णगडमध्ये ३ हजार ३५१ खासगी आणि दाभोळमध्ये १ हजार २७९ खासगी गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:16 AM 14-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here