रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मा. ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते संपन्न

0

मा. ना. उदयजी सामंत पुरस्कृत ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२० या स्पर्धेचं उद्घाटन रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे मा. ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष प्रदीपजी उर्फ बंड्या साळवी, महाराष्ट्र क्रिकेट असो. सदस्य किरण सामंत, उद्योजक रोशन फाळके, बांधकाम सभापती जि. प. महेश उर्फ बाबू म्हाप, दीपक पवार, निमेश नायर, जितू शेट्ये व इतर मान्यवर उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात मान्यवर याचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक सामन्यात नाणे फेकीच्या वेळी चांदीचे नाणे वापरण्यात येणार आहे. जो संघ सामना हरेल त्या संघाला हे चांदीचे नाणे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजेता संघाला ३ लाख रोख रक्कम व चषक, उपविजेता संघाला १ लाख ५० हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्रत्येक सामन्यात सामनावीर व स्पर्धेतील मालिकावीरला सुपर स्पोर्ट्स बाईक देण्यात येईल. स्पर्धेचे tennis cricket. in या युट्युब माध्यमातून लाईव्ह प्रेक्षपन दाखवले जाणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here