अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्ववत

0

राजापूर : रविवारी मध्यरात्री अणुस्कुरा घाटात किरकोळ प्रमाणात दरड कोसळल्याने घाटमार्गे कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद पडली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दरड हटविली आणि सोमवारी सकाळपासून अणुस्कुरा मार्गे वाहतूक सुरू झाली. कोकण व कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटांपैकी केवळ अणुस्कुरा घाटमार्गे सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे. सध्या या घाटमार्गे रत्नागिरी, लांजा, देवरूख यासह राजापूर आगाराच्या एसटी सेवेसह, माल वाहतूक पेट्रोल, डिझेलसह गॅसचे टँकर, घरगुती सिलिंडरची वाहतूक ,जळाऊ लाकडाची वाहतूक सुरू आहे. खासगी वाहने याच घाटमार्गे ये-जा करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 14-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here