टेनिस बॉल क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणाऱ्या या नेत्रदीपक स्पर्धेच्या ७ व्या पर्वाची आज ९ फेब्रुवारी २०२० रोजी अतिशय थाटामाटात सुरवात झाली.
या किर्तीमान स्पर्धेच्या पहिल्या दिवसाखेरीज गावदेवी गावठण,श्रावणी XI,जागृती XI,रत्नागिरी कुवैत या ४ बलाढ्य संघांनी केला आपला पुढील फेरीत प्रवेश निश्चित.
विशेषतः चारही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग यशस्वीरीत्या केला.
पहिल्या सामन्यात गावदेवी गावठण संघाने दिला शिवांश XI संघाला पराभवाचा धक्का. गावदेवी गावठण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम शिवांश XI संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर शिवांश XI संघाने प्रथम फलंदाजी करत असताना एक उजव्या हाताचा घातक फलंदाज मिस्टर.नरेंद्र नेगी याच्या घनागाती फलंदाजीच्या जोरावर या ६ शटकाच्या सामन्यात गावदेवी गावठण संघसमोर ५४ धावसंख्येच लक्ष ठेवलं. नरेंद्र नेगीने १२ चेंडूंचा सामना करत ३ चौकार तसेच एक षटकार लगावत कुटल्या स्वतःच्या वैयक्तिक २४ धावा. गावदेवी गावठण संघामार्फत उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज मिस्टर.वसीम सय्यद याने केली आपल्या भेदक गोलंदाजीची कमाल, वसीम ने स्वतः वैयक्तिक २ षटक हाताळत अवघ्या १४ धावा देत केले ४ बलाढ्य गडी बाद. तर ५४ धावसंख्येच लक्ष पार करत असताना मात्र गावदेवी गावठण त्यांचे आघाडीचे फलंदाज समाधान वास्कर,परेश कडके,अभिजित ठाकूर हे स्वस्तात बाद झाल्यानंतर प्रशांत कडू,अमित नाईक या महान फलंदाजांनी आपल्या संघाच्या फलंदाजीची धुरा सांभाळत सामन्यात आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. ४ बलाढ्य गडी बाद करणारा वसीम सय्यद ठरला सामन्यातील सामनावीर.
दुसऱ्या सामन्यात श्रावणी XI संघाने JSW संघाला आपल्या हुकमी गोलंदाजीच्या जोरावर एकहाती पराभवाची धूळ चारली. श्रावणी XI संघाने JSW संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. श्रावणी XI संघामार्फत या ६ शटकाच्या सामन्यात अनिकेत राऊत (१-०-४-१),प्रीतम बारी (१-१-०-२),अक्षय घरत (१-०-४-१),मुस्सा पटेल (१-०-२-०),प्रजोत अंभीरे(१-०-३-२) या महान गोलंदाजांनी अक्षरशः आपल्या गोलंदाजीची आग ओकली. JSW संघाला अवघ्या २८ धावसंख्येवर रोखलं. स्पर्धेतील पहीले निर्धाव षटक टाकण्याचा मान प्रीतम बारीने मिळवला. तर श्रावणी XI संघामार्फत योगेश चौधरी सहित अनिकेत राऊत यांनी एकतर्फी फलंदाजी करत सामन्यात तब्बल १० गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील एका मोठ्या विजयाची नोंद आपल्या नावी केली. प्रीतम बारी ठरला सामन्यातील सामनावीर.
तिसऱ्या सामन्यात जागृती XI संघाने दिला काँट्रॅक्ट XI संघाला पराभवाचा धक्का. जागृती XI संघाने नाणेफेक जिंकून काँट्रॅक्ट XI संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रावणी XI पाठोपाठ जागृती XI संघानेही आपल्या गोलंदाजीचा हल्ला मचावला. सूरज दुधकर (२-०-१३-२),केतन म्हात्रे (२-०-८-१),गिरीश (१-०-२-१),सोमनाथ भोईर (१-०-५-१) या गोलंदाजांनी अक्षरशः डोळ्याची पारणे फेडणारी गोलंदाजी करत काँट्रॅक्ट 11 संघाला अवघ्या २८ धावसंख्येवर रोखलं. तर हे २९ धावसंख्येच लक्ष अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार करत जागृती XI संघाने केला पुढील फेरीत प्रवेश. २ षटकात अवघ्या १३ धावा देत २ बलाढ्य गडी बाद करणारा सहित क्षेत्ररक्षणात २ झेल टिपणारा सूरज दुधकर ठरला सामन्यातील सामनावीर.
चौथ्या सामन्यात रत्नागिरी कुवैत संघाने गोल्डन XI या दिग्गज संघाला दिला पराभवाचा धक्का. रत्नागिरी कुवैत संघाने नाणेफेक जिंकून गोल्डन XI संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या ६ षटकाच्या सामन्यात गोल्डन XI संघाची सुरवात अतिशय डगमगती झाली ३ षटकात १८ धावांवर ५ बाद इतकी बिक्कट अवस्था असताना असं वाटू लागले जणूकाही गोल्डन XI संघ या सामन्यात एकहाती पराभवाच्या छायेत जातोय की काय परंतु तदनंतरच्या ३ षटकात निलेश मुळे (११ चेंडूत २२),मंदार मयेकर (७ चेंडूत १९ नाबाद),गुरुप्रसाद मुद्रे (४ चेंडूत १२ नाबाद) यांनी टोलेजंग फलंदाजी करत या ६ षटकाच्या सामन्यात रत्नागिरी कुवैत संघसमोर ७२ धावांच भलंमोठं आव्हान ठेवलं. तर हे ७२ धावांच भलंमोठं आव्हान पार करत असताना रत्नागिरी कुवैत संघामार्फत घडलं काय? तर संघाचा सलामीवीर उजव्या हाताचा एक अतिशय घातक फलंदाज मिस्टर.अदनान नाखवा याने केली आपल्या बहारदार फलंदाजीची कमाल, जणुकाही मैदानात अदनान नावाची सुनामी आली होती की काय असें वाटू लागले. या अदनानने १५ चेंडूंचा सामना करत गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत ३ चौकार तसेच ४ उतुंग षटकार ठोकत कुटल्या स्वतःच्या वैयक्तिक ४१ धावा. तर शाहरुख माजगावकरने ५ चेंडूंचा सामना करत स्वतःच्या वैयक्तिक १५ धावा कुटत अदनानला योग्य ती साथ देत आपल्या रत्नागिरी कुवैत संघाला मिळवून दिला पुढील फेरीत प्रवेश.
मनविजेता अदनान नाखवा ठरला सामन्यातील सामनावीर.
सर्व विजयी संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन सहित पुढील फेरीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.
