होय भूतं आजही आहेत!…

0

✍️ श्री गौतम सुभाष बाष्टे
(रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स)

➡ २८ ऑगस्ट ला माउंटन स्पोर्ट्स अकादमी तर्फे रायगड पाली येथील कोंडगाव धरणाला लागून असलेल्या कालेकर कॅम्पसाईट मध्ये एक आगळ वेगळे शिबीर भरवण्यात आले होते. शिबिराचे मूळ स्वरूप पुरस्कार सोहळा व विचारांची दववणघेवण हाच होता.४०संस्था चे प्रत्येकी एक असे प्रतिनिधी एकत्र येऊन आपापल्या संस्थेच्या कार्याचे सादरीकरण करणार होते,यात आमच्या “रत्नदुर्ग माउंटेनिअर्स” तर्फे मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. या शिबिरात आलेला एक आगळा वेगळा अनुभव जसाच्या तसा व्यक्त करतोय…..
आजच्या सकाळपासून च्या प्रवासात पावसाने प्रचंड मेहेरबानी केली होती . पण जस जशी कॅम्प साईट जवळ येत होती तसे भर दुपारी १२ वाजता सुद्धा धुकं प्रचंड जाणवत होते.घनदाट जंगल उंच डोंगर रांगा आणि त्यात अडकून असलेले ढग आणि भयाण शांतता अश्या वातावरणात गुगल बाबा सुद्धा हरवून गेले आणि निव्वळ M S A( माउंटन स्पोर्ट्स अकादमी) च्या नियोजन बद्ध सूचनांचे स्मरण करून कॅम्प साईट वर पोहोचलो. एखाद्या भयपटा साठी योग्य असा शेवटच्या दहा मिनिटांचा प्रवास होता पण एका बाजूला धरणाचे वाहणारे पाणी,धबधबा आणि घनदाट जंगल यात वसलेले हे कॅम्प रिसॉर्ट म्हणजे जणू स्वर्गलोका चा भास होत होता. आता मी सुद्धा पूर्णपणे हरवून गेलो होतो. सगळा प्रवासाचा आलेला थकवा निघून गेला होता.
जरा पुढे सरकलो तिथे अनेक निरनिराळ्या संस्थानचे,व निरनिराळ्या वयोगटाचे प्रतिनिधी जमलेले होते. सगळ्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता आता मात्र मी पुन्हा एकदा टीम रत्नदुर्ग ला खूप मिस केल प्रवासभर साऱ्यांच्या आठवणी होत्याच पण आता सगळ्यांना एकत्र बघून मला काही क्षण सगळ्यांची उणीव भासली प्रथमच असा हा इव्हेंट टीम रत्नदुर्ग एकट्याने येण्याची पहिलीच वेळ होती; माझ्यासाठी पण आणि टीम रत्नदुर्ग साठी सुद्धा .चालता चालता जरा सावरलो आणि माऊंटन स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष श्री नंदु चव्हाण त्यांच्याजवळ हजेरी लावली आणि पुन्हा निसर्गाच्या कुशीत शिरलो .ऑर्गनायझर आणि पार्टिसिपेट असा काहीच भेदभाव नव्हता अगदी दिग्गज खेळाडू गिर्यारोहक तसेच २९ देशांची सायकल सफर करणारे सायकलस्वार अनेक हॉकी खेळाडू घडवणारे हॉकी कोच अशी “माऊंटन स्पोर्ट्स अकादमी” ची मंडळी आम्हा सगळ्यांमध्ये कसलही अंतर न बाळगता सहज मिसळली होती. सगळ्यांचे जेवण ही झाले थोडावेळ विश्रांती घेऊन झाल्यावर एक खणखणीत शिट्टी कानावर पडली. सगळे एकत्र झाले आणि बाजूला असलेल्या हॉलमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली .कोणी कोणाच्या बाजूला बसायचं ,कोणाला कोणत्या जागेवर उठायचं हे सगळे एक चमत्कारिक आणि गमतीशीर पद्धतीने अगदी सहज रित्या करण्यात आल. नियोजन एकत्रीकरण हे इतक्या सहज आणि शांतपणे होऊ शकतं यावर विश्वासच बसत नव्हता. सगळ्यांची जागा निश्चित झाल्यावर थोड्यावेळाने पुन्हा एक इंट्रोडक्शन राउंड झाला तोही जरा वेगळ्या प्रकारचा होता .साधारण अर्ध्या तासात प्रत्येकाने प्रत्येकाची आपणहून ओळख करून घेतली, प्रत्येकाचे कार्य समजून घेतले .आलेल्या सगळ्यांचीच कार्य ऐकून त्यांचे प्रेझेंटेशन ऐकण्याची व बघण्याची उत्सुकता वाढू लागली होती; पण पुन्हा एक विसल वाजली दहा मिनिटांचा ब्रेक झाला. त्यानंतर चहा कॉफी व नाश्ता झाला. आणि पुन्हा एक खणखणीत शेट्टी वाजली आम्ही सगळे एका ग्राउंड मध्ये जमा झालो एक छोटासा खेळ खेळायचा होता हा गमतीशीर खेळ आम्हाला अजून एकत्र करून गेला आता वयामध्ये कोणाच्याच कसले अंतर नव्हते. आता तर एकदम ताजेतवाने वाटू लागले होते .संध्याकाळची वेळ होत आली होती, परत दहा मिनिटांची सुट्टी घेऊन आम्ही हॉलमध्ये प्रेझेंटेशनसाठी एकत्र आलो .प्रेझेन्टेशन चालू झाली पहिलं मालवण रेस्क्यू टीमने भावनिक सुरुवात केली त्यांचे निरागस प्रेझेंटेशन ऐकून आणि बघून या कार्यक्रमाला एक वेगळी सुरुवात झाली पुढे कोणी भावनीक तर कोणी सकारात्मक पण पूर्णपणे उस्फूर्तपणे आपले प्रेझेंटेशन करत होते मोजून चार प्रेझेन्टेशन झाली प्रत्येकाला वीस ते तीस मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पण पुढच्या माणसाला तळमळीने खूप काही बोलायचे होते, आणि तितक्याच तळमळीने आणि उत्सुकतेने आम्हालाही प्रत्येकाचे प्रेझेंटेशन ऐकावेसे वाटत होते .वीस मिनिटाचा वेळ साधारण पाऊण तास एक तास असा होत होता. रात्रीचे नऊ वाजले होते अजून एक प्रेझेंटेशन ऐकून जेवायला जायचे आहे अशी सूचना देण्यात आली. तेही प्रेझेंटेशन एक तास कधी घेऊन गेले हे समजलेच नाही प्रत्येक प्रेझेंटेशन नंतर सगळ्यांचा एक वेगळाच संवाद होत होता त्याच्यामध्ये अजून थोडा वेळ जात होता पण हे सारे आवश्यक होते. कायद्याचा अभ्यास निरंजन दादा कायदे विषयी योग्य ते मार्गदर्शन व त्यांच्या कार्यात असलेल्या या गोष्टींमुळे होणारे कायदेशीर फायदे या गोष्टींवर निरंजन या नावाप्रमाणेच निरंजन या नावाला जागून विषय प्रकाशित करत होता. ठरल्या प्रमाणे जेवणासाठी जमलो जेवताना शांतपणे जेवावे हा नियम आम्ही पूर्णपाणे विसरलो होतो. फक्त आता निसर्ग पूर्ण पाने शांत होता आणि जेवणासोबत जबरदस्त चर्चा रंगल्या होत्या ,सर्व संस्थानचे प्रतिनिधी आणि खास करून (M S A)चे प्रतिनिधी सगळे मिळून एक परिवार बनला होता .शतपावली साठी आता परत वाहत्या पाण्याने साद घातली.पाऊले तिकडे वळली भयाण शांतता आणि मनाला चर करून सोडणार काळोख, यात वाहणाऱ्या धबधब्याचा आवाज आणि आणि प्रकाश इतकेच दिसत होते. तेव्हड्यात” मनाला स्वाभाविक चाटून जाणारी भीती चाटून गेली” मनात आले इथे भूत आले तर…! जरा घाबरलोच आणि निसर्गाचा मोह सोडून माणसांकडे वळलो ,माणसांच्यात आलो पण भूत मनातून जाईना. पुन्हा प्रेझेन्टेशन ला सुरुवात झाली एक भयाण शांतता आणि त्यात आपला जीव ओतून एकाग्रतेने आपली मतं आणि कार्य याची ओळख करून देणारा वक्ता हे सारं अगदी खोल मनापर्यंत जात होत.
आत्ता परेंत होणारी प्रेझेन्टेशन ही समाजसेवा खासकरून रेस्क्यू म्हणजे माणसांचे रेस्क्यू प्राण्यांचे रेस्क्यू यावर अवलंबून होती. आताचे प्रेझेंटेशन ऐकत होतो ते मात्र मला माहीत नसलेल्या या विषयावर ते चालू झाले ते म्हणजे प्लेटलेट्स डोनेशन ब्लड डोनेशन सारखच हे एक डोनेशन आहे आणि त्याची आवश्यकता ही भरपूर आहे एखाद्या व्यक्तीवर त्याच्या चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी ही मंडळी आपला वेळ आणि प्लेट्स आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊन म्हणजे कोणी सत्तर वेळा, कोणी एकशे तीस, वेळा तर कोणी तब्बल ‘अडीचशे वेळा’ हे डोनेशन दिले आहे आणि त्यामुळे अनेक आजारांमध्ये पछाडलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येण्याचे फोटो हे मनाला वेगळेच वळण देऊन गेले. एकंदर पेशंटचे पाहिलेले फोटो हे मनाला थक्क करणारे होते .मन परत भरकटले अशा मृत्यूच्या छाये नंतर काय? असा मनाला प्रश्नच चाटून गेला. त्या सुपर हिरो चे प्रेझेंटेशन आटपले आणि एक कॉलेज युवक समोर येऊन उभा राहिला. सध्याची तरुणाई मोबाईल मध्ये किती व्यस्त आहे हे सांगण्या मध्ये अनेक जण आपला वेळ खर्च करतात पण हा तरुण पाहून एक वेगळीच प्रसन्नता लाभली. तो गड आणि किल्ले यांच्यावर बोलत होता या तरुणाचा उत्स्फूर्तपणा इतका होता की त्याच्या प्रत्येक शब्दातून एक वेगळीच ऊर्जा दिसत होती. सुमारे चारशे किलो चा एक दरवाजा असे दोन दरवाजे त्यांनी गडावर कसे नेले याची कहाणी तर मला माझे कार्य किती कमी आहे याची जाणीव करून गेले. रागवू नका पण आमचे रेस्क्यू हे माणसांसाठी प्राण्यांसाठी अशा जीवाशी संबंधित गोष्टींसाठी अवलंबून असते .पण या गड किल्ल्यांच्या तरुणांसाठी गडावरचा एक दगड सुद्धा तो त्यांच्यासाठी एक जीवच असतो त्यांच्या साठी तो सजीवच असतो. त्यात ते त्यांचा जीव ओतून तेथे रेस्क्यू करत असतात, याची जाणीव झाली. पण हे सगळं या वयात कसं शक्य आहे? यांच्यात ही जाणीव येते कुठून?ही बलाढ्य शक्ती अशा मंडळींना येते कुठून? अशा विचारांमध्ये मी पूर्णपणे गाढून गेलो. ती रात्र तो काळोख आणि ती शांतता या सगळ्या पलीकडे जाऊन त्या तरुणाच्या मानगुटीवर बसलेले एका मावळ्यांचे चे भूत मला जाणवू लागले. अशी भूतच यांना प्रेरणा देतात हेच उत्तर मन मला देऊन गेले. मी सर्वत्र नजर फिरवली सगळे शांत बसले होते. प्रत्येकाने केलेले अविश्वसनीय कार्य हे निसर्गाच्या चमत्कारिक शक्ती वरच अवलंबून होते. या शक्तीशिवाय काही घडू शकत नाही. ही एकंदरीत आलेली वेगळीच परिस्थिती होती आता मला त्या हॉलमध्ये बसलेल्या या प्रत्येकाच्या मानगुटीवर ची निरनिराळी भूत भासत होती कोणाच्या मानेवर क्रांतिकारी चे भूत तर कोणाच्या मानेवर मावळ्यांचे भूत तर कोणाच्या मानेवर निसर्गाच्या आणि प्राण्यांच्या संरक्षणाचे भूत असे सगळे भूतांचे प्रकार होते भरपूर घाबरलो आणि माझ्या बाजूच्या दोन्ही खुर्चीवर नजर टाकली माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या खुर्चीमध्ये आणिक उजव्या बाजूच्या खुर्चीमध्ये दोन सारखीच ध्येयवेडी भूत बसली होती त्यामध्ये एका खुर्चीवर अविनाश सर व दुसऱ्या खुर्चीवर आप्पा अशी दोन चमत्कारिक माणसं ज्यांनी सायकल वरून चक्क २९ देश पालथे घातले होते अशी ध्येयवेडी भूत मला जाणवत होती. या सगळ्यांमध्ये एक मात्र खरी गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे माझ्या मानेवर असलेले काही काही प्रमाणातील मी पणा चे भूत हे माझ्यातून नष्ट होऊन गेले होते. थोडक्यात काय समाजामध्ये वावरताना अशी भूत हे आपल्या आसपास असतातच. म्हणूनच हा देश चालला आहे आणि ही भूत किंवा या भूतान पासून आपल्याला कसलाही धोका नाही. उलट मदतच होते. फक्त तुमची दृष्टी तशी, हवी तशा भावना तुमच्या हव्यात. ही भूत धोकादायक नाही याची खात्री झाल्याने ,आणि ही सगळी देशसेवेची रूप आहेत याची खात्री पटल्याने आता मला कसलीही भीती वाटत नव्हती. सगळं काही प्रसन्न वाटत होते. खूप दिवसांनी एका मंदिरात बसल्याचा भास होत होता. रात्रीचे तीन वाजले होते त्यामुळे सकाळी लवकर उठाता यावे यासाठी उरलेली प्रेझेंटेशन उद्या होणार होती. प्रेझेंटेशन आटपल्यावर ही झोपायला न जाता ही सगळी भूत शांत आवाजात एकमेकांवर वैचारिक देवाण-घेवाण करण्यात गुंतलेली होती. मी मात्र दिवसभराचा प्रवास विसरून या सगळ्या भावनांचा गुंता गुंती मध्ये अडकून पडल्याने हा गुंता सोडवायला टेंट पाशी गेलो गुंता काही सुटत नव्हता. जे प्रेझेंटेशन मी करणार होतो त्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडा मी पण होताच. त्यामुळे सकाळी माझ्या प्रेझेंटेशनच्या वेळी मी पणा सोडून सर्वांचे प्रेझेन्टेशन करायचा मी निर्णय घेतला.आमचे रत्नदुर्ग चे अध्यक्ष श्री वीरेंद्र वणजू, व फिल्ड इन्चार्ज श्री गणेश चौघुले यांना सकाळी मी आपलं प्रेझेंटेशन बदलत आहे याची कल्पना दिली , माझ्यातील मी पणाचे भूत बाजूला करून मी माझ्या ग्रुप चे प्रेझेंटेशन केले “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणे लागतो” याच भावनेतून आपल्या सगळ्या सोबतच आमचा ग्रुप कसा चालला आहे ,हे सगळ्या “माऊली” समान संस्थाना पटवून सांगून आम्हीही तुमच्यातील एक घटक आहोत असे असे मनोगत व्यक्त करत मी माझे प्रेझेंटेशन पूर्ण केले .थोड्या वेळाने कार्यक्रम आटपून जेवण वगैरे उरकून साधारण पाच वाजता सगळ्यांचा निरोप घेऊन रत्नागिरी कडे निघालो .वाटेत “बल्लाळेश्वराचे” दर्शन घेतले आणि प्रवासाला सुरुवात केली या सगळ्या भुतांच्या कार्याची आठवण आणि विचार करत रात्री बारा वाजता घरी कधी आलो समजले सुद्धा नाही. ही सगळ्यांची भूत सोबत आहेत असा आजही भास होतो. आणि या सगळ्यांमध्ये “माऊंटन स्पोर्ट्स अकादमी” चे अध्यक्ष श्री नंदू चव्हाण यांच्या मानेवर बसलेले संस्थांच्या एकत्रीकरणाचे भूत या भुताचे विशेष आभार मानत ,दोन दिवसात झालेली धावपळ याचा विसर पडून झोपी कधी गेलो समजलेच नाही .हे दोन दिवस आयुष्यात खूप काही देऊन गेले जे व्यक्त करणे हे फार अवघड आहे .पण आयुष्यातील या दोन दिवसानंतर मला समोर येणाऱ्या प्रत्येकाच्या मानेवर असलेली भूत चांगली आणि वाईट ही पूर्णपणे जाणवायला लागली आहेत. कोणाच्या मानेवर चांगले भूत, तर कोणाच्या मानेवर वाईटाचे भूत बसलेले असते. त्यामुळे तो “देह तसा वागत असतो” याची खात्री झाली आहे. त्यामुळे समोरचा माणूस वाईट नसतो त्याच्या मानेवरती बसलेल्या भुताटकी वरती त्याचा स्वभाव अवलंबून असतो याची आता मला पूर्णपणे खात्री पटली आहे.
पुन्हा परत परत सांगावेसे वाटते की अशी देश सेवेने झपाटलेली भूत तुम्हाला कधी दिसली तर त्यांना घाबरू नका, तुमच्या परीने त्यांना सहकार्य करा, ती तुम्हाला काही करणार नाहीत .पण त्यांच्याविरोधात गेलात तर मात्र तुमच्यापेक्षा त्यांचा अनुभव आणि ताकत ही प्रचंड आहे याचे मात्र पूर्ण भान असू द्या
जयहिंद 🙏🙏

✍️ श्री गौतम सुभाष बाष्टे
(रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स)

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 14/Sep/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here