पाली बसस्थानक आवाराची दुरवस्था

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा व मिऱ्या-नागपूर या प्रमुख दोन राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती पाली बसस्थानक आवारात खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांसह अन्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पाली बसस्थानक आवारात पडलेले मोठे मोठे खड्डे त्यामुळे सर्वत्र पसरलेला चिखल यामुळे प्रवाशांना नीटसे चालताही येत नाही. तसेच इतरही अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे सध्याच्या हंगामामध्ये प्रवाशांचे आणखी हाल होत आहेत. पाली बसस्थानक मध्यवर्ती असल्याने येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यातच पावसाळ्यामध्ये बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात खड्डे पडल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानक परिसरातून जा-ये करताना अवघड झाले आहे. त्यातच एस.टी. बसस्थानकाच्या गाड्या बाहेर पडण्याच्या गेटवर मोठा खड्डा पडल्याने गाड्या आपटून आतील प्रवाशांना त्याचा दणका बसतो आहे. रात्रीच्या वेळी तसेच मोठ्या पावसामुळे या खड्यात पाणी भरल्यानंतर हा खड्डा चालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे गाडी मोठ्या प्रमाणात आदळली जाते. दरम्यान, नवीन प्रसाधनगृहही रात्रीच्या वेळी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. बसस्थानकात कबुतरांच्या वास्तव्यामुळे झालेल्या घाणीमुळे अस्वच्छता असते. त्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तरी याकडे एस.टी. महामंडळाने लक्ष देऊन गैरसोयी दर करण्याची मागणी होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:00 PM 14-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here