कोल्हापूरच्या महापौरपदीही महाविकास आघाडीचा विजय

0

कोल्हापूर महापालिकेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड झाली आहे. भाजप-ताराराणी आघाडीच्या बहुतांश नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने आजरेकर यांनी 48-1 ने निर्विवाद विजय मिळवला. निलोफर आजरेकर यांना कोल्हापूरच्या 50 व्या महापौर होण्याचा मान मिळाला आहे. महापालिकेतील संख्याबळ पाहता आजरेकर यांच्या निवडीची घोषणा केवळ औपचारिकता होती. भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार अर्चना पागर यांना केवळ 1 मत मिळालं, तर आजरेकर यांना 48 मतं पडली. महापौर निवडीसाठी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. एकमेव उपस्थित सदस्य कमलाकर भोपळे यांनी अर्चना पागर यांच्यासाठी मतदान केल्याने त्यांना एकच मत मिळालं. निलोफर आजरेकर यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केलं.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here