बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनीमधील कामगार व इतर क्षेत्रांतील संघटित व असंघटित कामगार यांच्याकरिता वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. याकरिता एका डिजिटल चेकअप बस तयार करण्यात आली आहे. या बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. या बसमध्ये अद्ययावत अशा डिजिटल एक्स-रे, डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी, बहिरेपणाची तपासणी फुप्फुसाची तपासणी व रक्ताच्या विविध तपासण्या करणारी उपकरणे असून कामगार काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी करणार आहे.
