‘लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आपल्या दारी’

0

रत्नागिरी : भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक खाते अपडेट होत असून थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आपल्या दारी ही संकल्पना राबविणार आहे, अशी माहिती लाचलुचपत रत्नागिरीचे नूतन उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली. लाचलुचपत कार्यालयात उप अधिक्षक पदावर रुजू झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. चव्हाण यांनी यापुर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात काम केले होते. सध्या ते बढतीने रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आले आहेत. ते म्हणाले की भ्रष्टाचार सर्वत्र असतोच. समाजाचे काम योग्य पद्धतीने चालावे यासाठी या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक असते. मात्र काही अडचणींमुळे किंवा काही गैरसमजुतीमुळे तक्रारदार यासाठी तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. जोपर्यंत सहन करणे शक्य आहे तोपर्यंत अनेकदा अशा प्रकारांना खतपाणीच घातलेले दिसून येते. तक्रारदारांच्या अडचणींवर मात करण्यासाठी खात्यातर्फे विचार सुरु आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती अडचणीची आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कार्यालय लांब असल्यानेही अनेकदा तक्रारदार इथे येणे टाळतो, हि परिस्थिती लक्षात घेऊन आता लाचलुचपत प्रतिबंधक खाते आपल्या दारी हि संकल्पना राबविण्यात येणार असून तक्रारदाराने आमच्याशी संपर्क साधला आणि तो लांब राहणार असेल तर आमची टीम तिथे जाऊन त्याची तक्रार दाखल करून घेऊ शकते, त्याशिवाय याच माध्यमातून तक्रार दिल्यानंतर जबाब, अन्य कागदपत्रे यासाठी होणारी तक्रारदाराची धावपळ सुद्धा कमी केली जाणार आहे. यातून तक्रारदाराचा वेळ, पैसे सुद्धा वाचणार आहेत. याशिवाय तक्रारदार व्हाट्सअप द्वारेही तक्रार देऊ शकणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. कामासाठी पैसे मागणे इतक्या पुरताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कारभार मर्यदित नाहीत तर कोणत्याही शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार असेल किंवा कोणीही अधिकची संपत्ती जमा केली असेल तर त्याच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करता येते. नागिरकांनी विश्वासाने संपर्क करावा आणि भ्रष्टचारमुक्त समाजासाठी सहकार्य करावे. त्यासाठी 1064 या टोल फ्री क्रमांकासह मारुतीमंदिर येथील लाचलुचपतच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:19 PM 14-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here