कॉलेज कंपाऊंडमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञाताकडून लंपास

0

रत्नागिरी : कॉलेजच्या कंपाऊडमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची तक्रार नुकतीच शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. (८फेब्रुवारी सकाळी सव्वा आठ ते दुपारी सव्वाच्या सुमारास एम डी नाईक ज्युनिअर कॉलेज धनजीनाका कंपाउंड येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद फैज नदीम खतीब (वय १७, रा. विराज हाईट्स, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर- रत्नागिरी) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ एडी ३८७४) ही एमडी नाईक ज्युनिअर कॉलेज धनजी नाका कंपाउंड येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. या प्रकरणी खतीब यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बगड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here