मंडणगड बसस्थानक नूतनीकरणाबाबत लवकरच कार्यवाही – अनिल परब

0

दापोली मतदार संघातील माजी आमदार संजय कदम यांनी मंडणगड बस स्थानक नूतनीकरणाबाबत दि. ५ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ना.अनिल परब यांची भेट घेवून बसस्थानक लवकरात लवकर नूतनीकरण करण्याची मागणी केली. मंडणगड शहरातील बसस्थानकाची दुरावस्था झाली असुन नागरिकांना खुप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकाची इमारत मोडकळीस आली आहे. प्रसाधन गृह व शौचालय यांची ही दुरवस्था झाली आहे. या समस्यांचा विचार करता मंडणगड बसस्थानक नव्याने उभारण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून परिवहन मंत्री अनिल परब यांचे या समस्येकडे लक्ष वेधून घेतले यावर मंत्रीमहोदयांनी या समस्येबाबत लवकरच कार्यवाहीचे आश्वासन माजी आमदारांना दिले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here