प्रचितगडावर बसणार नवीन लोखंडी शिडी, २० लाखांचा निधी मंजूर

0

साडवली : संगमेश्वर तालुक्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगड हा स्वराज्यातील एक अजिंक्य गड आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागातील गिर्यारोहक आणि पर्यटक प्रचितगड पाहण्यासाठी येतात. मात्र, सद्यस्थितीत शेवटच्या टप्प्यात गडावर नेणाऱ्या शिडीची दुरावस्था झाल्यामुळे ती जीवघेणी ठरत असल्याचे समजताच चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी याची दखल घेत नवीन शिडीसाठी आणि रस्त्यासाठी क वर्ग पर्यटनमधून २० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे शिवप्रेमाचा या शिडीवरूनचा जीवघेणा प्रवास थांबणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:07 PM 15-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here