आंध्रपेक्षा कडक कायदा करू; नागरिकांनी संयम बाळगा – मुख्यमंत्री

0

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला. पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल असं म्हटलं आहे. तसेच नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. ‘आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही, असा कायदा करू. आंध्रपेक्षा कडक कायदा करू. नागरिकांनी संयम बाळगा’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच ‘हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here