जिल्हा शासकीय रुग्णालय आता ‘नॉन कोव्हिड’ रुग्णालय

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आता पूर्णपणे ‘नॉन कोव्हिड’ रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. गेले वर्षभर शासकीय रुग्णालय हे कोव्हिड रुग्णालय म्हणून सुरु होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने दि. १ सप्टेंबरपासून रुग्णालय नॉन कोव्हिड म्हणून सुरु करण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व रुग्ण आता महिला रुग्णालयातच दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व उपचार शासकीय रुग्णालयात सुरु करण्यात आले असून, शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांत कोरोना रुग्णसंख्या जिल्ह्यात आटोक्यात आली आहे. विशेष म्हणजे रुग्ण मृत्यू संख्याही घटली आहे. कोरोना आटोक्यात येत असले तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लॅन्ट, कोरोना सेंटर व इतर सुविधांची तयारी ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सिव्हिल आता नॉन कोव्हिड म्हणून सुरु करण्यात आल्याने सर्वसामान्य रुग्णांना चांगला दिलासा मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:14 AM 16-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here