लांजा नगर पंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदग्रहण सोहळा आज नगर पंचायत, लांजा येथे होणार आहे. लांजा नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा प्रत्यक्ष कार्यकाल सुरू झाला नव्हता. दि. ८ जानेवारीला निकाल लागल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार हाती घेतला नव्हता. जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाल सोमवारी संपुष्टात येत असल्यामुळे नवीन पदाधिकारी आपला पदभार हाती घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत.
