गणेशोत्सवासाठी आलेले 53 चाकरमानी कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या 11 हजार 549 चाकरमान्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी आरटीपीसीआर चाचणीत 4 जण आणि अॅण्टीजेन चाचणीत 49 असे एकूण 53 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. गणेशोत्सवात गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रशासनाने काही निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार लसीचे दोन डोस घेतलेल्या किंवा 72 तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या चाकरमान्यांना थेट प्रवेश देण्यात येत होता. ज्यांनी डोस घेतलेले नाहीत किंवा ज्यांनी आरटीपीसीआर चाचणी केलेली नाही अशांची प्रशासनाकडून कोविड चाचणी करण्यात आली. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्याबाहेरून 1 लाख 20 हजार 428 प्रवासी आले. त्यापैकी 54 हजार 331 चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस घेतले होते. 22 हजार 032 जणांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आणला होता तर 44 हजार 065 जणांनी तपासणी केलेली नव्हती. त्यापैकी प्रशासनाने 11 हजार 549 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 1 हजार 126 जणांची आरटीपीसीआर आणि 10 हजार 423 जणांची अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. कोविड चाचणीमध्ये एकूण 53 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:50 AM 16-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here